जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यात सुरु असलेल्या सार्वत्रीक ग्रामपंचायत निवडणूक २०२३ च्या प्रचाराला सुरुवात झाली असून पहुर पेठ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गाव बचाव पॅनलच्याच्या वतीने पॅनल प्रमुख प्रफुल्ल लोढा यांच्या हस्ते नारळ वाहुन प्रचाराला सुरवात करण्यात आली.
प्रफुल्ल लोढा यांनी सरपंचासह संपूर्ण पॅनल विजयी करण्यासाठी मतदारांना आवाहन केले. तसेच सरपंचांसह संपूर्ण पॅनल निवडून आल्यानंतर गावातील पिण्याच्या पाण्याच्या समस्यांसह रस्ते, गटारी व इतर सुविधा त्वरीत मार्गी लावु अशी सभेच्या व्यासपीठावर उभे राहुन सर्व उमेदवारांनकडून शपथ देखील घेतली.
प्रफुल्ल लोढा यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यावर ताशेरे ओढले. पहूर पेठ मध्ये पहिल्यांदाच तिन पॅनल निवडणूक लढत असल्यामुळे हि निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. त्या मुळे या पहुरपेठ ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जामनेर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.









