जामनेर ( प्रतिनिधी) – काल पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस स्टेशन हद्दीत नेरी दुरक्षेत्र व शहापूर बीट हद्दीत तसेच खातगाव बीट हद्दीत अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या पथकाने माळपिंप्री , भागदरा , हीवरखेडा या गावामध्ये गावठी हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई केली.
या कारवाईत ५६०००/ रुपये किमतीचे ३४०० लिटर्स गुळ मोह मिश्रीत कच्चे रसायन , १०० लिटर्स उकळते रसायन व ३६ लिटर्स गावठी दारूसह भागदारा शिवारात उंबर नाल्याच्या काठावर दादाराव रामदास जोगी व राहुल नाना जोगी हे ( दोघे रा.भागदारा, ता.जामनेर ) हे त्या ठिकाणी मिळून आले. दुसऱ्या कारवाईत ३८९०० / रूपये किमतीचे १६०० गूळ मोह मिश्रित कच्चे रसायन , १५० लिटर्स उकळते रसायन , १५ लिटर्स हातभट्टी दारू व एक मोटार सायकलसह आकाश दीपक जाधव ( रा.माळपिप्री) हा मिळून आला.
१२४८ रुपये किमतीच्या २४ देशी दारूच्या बाटल्या अनिल पाटील व दिनकर बोरसे ( दोघे रा – हीवरखेडा ) यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या. या कारवायामध्ये एकूण ९६,१४८ रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. ही पूर्ण कारवाई जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे, स. फौ. संजय पाटील , पो.हे. कॉ. सुनील राठोड , विलास चव्हाण, विजय जोशी . पो. ना. राहुल पाटील , अतुल पवार , संदीप सुर्यवंशी , हंसराज वाघ , पो. को. जितेंद्र ठाकरे , निलेश घुगे , तुषार पाटील यांच्या पथकाने केली. अशीच कारवाई काही दिवसांपूर्वी तळेगाव व गाडेगाव या ठिकाणी करण्यात आली होती. पोलिसांच्या या कारवाई मुळे अवैध धंद्दे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.