जामनेर (प्रतिनिधी) – येथील जामनेरपुरा भागातील रहिवासी तरुण शेतामध्ये रात्री पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. २० फेब्रुवारी रोजी रात्री घडल्याची समोर आले आहे.
जामनेर पुरा भागांमध्ये राहणारा गोकुळ आनंदा राजपूत वय सत्तावीस हा त्याच्या शेतांमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता हरभरा पिकाला पाणी देत असताना विजेच्या ताराला पायाचा धक्का लागला आणि त्याला आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत्यू घोषित केले त्याच्या पश्चात आई वडील पत्नी भाऊ विवाहित बहिणी असा परिवार आहे जामनेर पुरा भागांमध्ये त्याला अतिशय कष्टाळू मनमिळावू म्हणून ओळखले जाते