कारसह एक जण ताब्यात ; जामनेर पोलिसांची कारवाई
जामनेर (प्रतिनिधी ) ;– एका स्विफ्ट डिझायर कारमधून बोदवड मार्गे जाणारा सुमारे चार लाख २९ हजार ९५० रुपयांचा प्रतिबंधित असलेला गुटखा जामनेर पोलिसांनी गुप्त माहिती मिळाल्यावरून मराठा मंगल कार्यालयाजवळ जळगाव रोडवर आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून जामनेर येथून एका स्विफ्ट कारने अवैधरित्या गुटखा नेणार असल्याची माहिती मिळाली होती . त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि सहकाऱयांनी जळगाव रोडवर असणाऱ्या मराठा मंगल कार्यालयाजवळ सापळा रचला असता कार थांबवून चालक पवन मोहीत गोसावी (वय २५ रा. मुक्ताईनगर ) याची चौकशी केली असता कारमध्ये विमल गुटखा ,तंबाकू ४ लाख २९ हजार ९५० रुपये आणि कार चार लाख रुपये असा एकूण ८ लाख २९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून पवन गोसावीला ताब्यात घेण्यात आले. हि कारवाई पोलीस निरीक्षक कीरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सागर काळे, तुषार पाटील,निलेश घुगे,अमोल पाटील, आदिनीं केली. याबाबत चालक पवन गोसावी यांच्यावर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहे.