चार दिवसांची मिळाली पोलीस कोठडी
जळगाव (प्रतिनिधी)- जामनेर येथे ग्लोबल हॉस्पिटलच्या उदघाटनाचे सभास्थळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा व्यक्ती हा बस कंडक्टर असून त्याला पोलिसांनी एलसीबीच्या मदतीने अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मंगळवार १३ ऑक्टोबर रोजी जामनेर येथे ग्लोबल महाराष्ट्र मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल व नर्सिंग होमचे उदघाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी आ. गिरीश महाजन यांचे कार्यकर्ते दीपक लक्ष्मण तायडे यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने फोन करून एक करोड रुपये भेज दे नाही तो बडा धमाका होता अशी धमकी दिली होती. तसेच धमकीचा मेसेजही पाठविला होता. यावरून जामनेर पोलीस स्टेशनल गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामनेर पोलीस स्टेशनचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे यांनी मिळून तपास सुरु केला. तांत्रिक माहितीवरून आरोपीचा शोध घेतला असता. संशयित आरोपी हा अमोल राजु देशमुख (वय-३२) रा. पहुरपेठ, ता. जामनेर हा असल्याचे निष्पन्न झाले. त्याला गुरुवारी १५ रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून १३ मोबाइलला जप्त करण्यात आले आहे. संशयित अमोल देशमुख हा राज्य परिवहन महामंडळाच्या पाचोरा डेपोमध्ये बसवाहक म्हणून नोकरीला आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप इंगळे, सफौ. किशोर पाटील, रमेश कुमावत, राहुल पाटील, आसिफ पठाण यांच्यासह स्थागूशाचे निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ. विजयसिग पाटील, पोहेकॉ. विजय पाटील, नरेंद्र वारुळे, प्रीतम पाटील, इशांत तडवी आदींनी हि कामगिरी बजावली.