जामनेर (प्रतिनिधी) – शहरातील खादगाव रोडवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसांसह एका तरूणाला अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पो नि किरण कुमार बकाले यांना गुप्त बातमीदारामार्फत जामनेर शहरात खादगाव रोडवर एक इसम गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली होती.
किरणकुमार बकाले यांनी पथकाची निर्मिती केली. या पथकाने बाळू शामा पवार ( वय २१, रा. डोहरी तांडा ता, जामनेर ) या संशयित तरूणाची चौकशी करून त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कमरेस एक गावठी कट्टा आणि एक राऊंड काडतुसे असणारे मॅगझीन आढळून आले. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीची वैदयकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी जामनेर पोलीस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई एलसीबीचे प्रमुख पो नि किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हवालदार महेश महाजन, लक्ष्मण पाटील; पो. ना. किशोर राठोड, रणजित जाधव, कृष्णा देशमुख, पो. कॉ. विनोद पाटिल, ईश्वर पाटील आणि भारत पाटील यांच्या पथकाने केली .