जामनेर तालुक्यातील वन अधिकाऱ्यांची माहिती


जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील फत्तेपूरजवळ काही अंतरावर असलेलं पर्यटन स्थळ म्हणजे ढालकीचा धबधबा आहे. तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील आकर्षण असंणारा हा धबधबा व येथील घनदाट जंगल सुंदर अशी ख्याती आहे. हे पर्यटन स्थळ १५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे.
जामनेरच्या वन अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. मुख्य कारण म्हणजे शासनाने या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सुंदर असे कोरीव काम केले असून ठिकठिकाणी वन्य प्राण्याचे देखावे वृक्ष लागवड असे बरेच काही सजवण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी चाललेल्या कामाचे नुकसान होऊ नये म्हणून वनपरीक्षेत्र अधिकारी, जामनेर यांच्या आदेशानुसार हे पर्यटन क्षेत्र १५ दिवसा करिता पर्यटनंसाठी बंद करण्यात येत आहे, असे कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्यटकांनी पुढील महिन्यातच येथे यावे, अशी माहिती देण्यात आली आहे.









