रेशन दुकानदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी
जामनेर (प्रतिनिधी ) ;– तालुक्यातील जोगलखेडा गावातील राशन दुकाना विरोधात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. मागील आठवड्यात तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिलेल्या निवेदनात, ग्रामस्थांनी रेशन दुकानदाराविरोधात गंभीर आरोप केले होते. निवेदनाची दखल घेऊन आज पुरवठा अधिकारी वैराळकर साहेब यांनी चौकशी केली असता चौकशीदरम्यान, गावातील ग्रामस्थांनीरेशन दुकानदाराविरुद्ध अनेक तक्रारीचा पाढा वाचला.
नागरिकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, रेशन दुकानदार यांच्याकडून अरेरावीची वागणूक मिळत असून धान्य मोजताना ते कमी येत असते . यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
पुरवठा अधिकारी यांनी चौकशीदरम्यान तक्रार बुक आणि इतर आवश्यक कागदपत्रे मागितली असता ते आढळून न आल्यामुळे दुकानदाराचा हलगर्जीपणा उघड झाला आहे.ग्रामस्थानीं रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
या प्रकरणी पुरवठा अधिकारी यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले कि लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल मात्र, ग्रामस्थांचा रोष लक्षात घेता, प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा गावातील सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर ग्रामस्थ या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी झाले आहेत, आणि आता पुरवठा विभाग काय कार्यवाही करते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे