जळगाव (प्रतिनिधी) : कसुरदार धर्मराज शशीकांत पाटील यांचे मालकीचे मौजे वाघारी ता. जामनेर येथील गट क्र. २४/२ क्षेत्र हे. १. ८० आर पैकी कसुरदार यांचे मालकीचे अविभाज्य क्षेत्र आहे. स्थावर मालमत्ता कसुरदार यांनी अवैध गौणखनिज दंड न भरल्याने शासन जमा करण्यात आलेली आहे.
त्यामुळे दंडाची वसुली करणेसाठी या मालमत्तेची जाहीर लिलाव दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे ठेवला आहे. ज्या कुणाला ही मालमत्ता घ्यावयची असतील त्यानी दि.१७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तहसिल कार्यालय जामनेर येथे संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार जामनेर यांनी केले आहे.