जामनेर तालुक्यातील नेरी गावाजवळची घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील नेरी गावाजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणाला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हर्षल गोपाल वराडे (वय ३२, रा. नेरीदिगर ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. नेरी गावात तो आई-वडील भाऊ यांच्यासह राहत होता. (केसीएन)मजुरी काम करून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान रात्री १२ वाजेच्या सुमारास नेरी गावाजवळ तो दुचाकी (एम एच १९ डि ई ७३४७) ने जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरात धडक दिली. अपघात एवढा भीषण होता कि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या धडकेत तो गंभीर जखमी झाला होता. ग्रामस्थांनी त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. (केसीएन)या वेळेला कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. प्रसंगी नेरी दुरक्षेत्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.