जामनेर (प्रतिनिधी ) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामनेर शहर आयोजित ११११ फूट भव्य तिरंगा ध्वजाची पदयात्रा आज जामनेर येथे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय जामनेर येथून काढण्यात आली. आली यावेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे प्रमुख म्हणून उपस्थित होते . महाविद्यालयमधील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक तसेच भारतीय विद्यार्थी परिषदचे सदस्य यावेळी उपस्थित होते. जामनेर तालुक्यातील नागरिकांनीही या तिरंगा पदयात्रेत आपला सक्रिय सहभाग नोंदविला . याप्रसंगी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
या वेळी जामनेर पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन,जितेंद्र पाटील,भाजपा तालुक अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,न प गट नेते डॉ.प्रशांत भोंडे , महेंद्र बाविस्कर यांच्या सह सर्व नगरसेवक पदाधिकारी .कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.