जामनेर (प्रतिनिधी ) – जामनेर आगारातील एसटी कर्मचारी यांचा तीन महिन्यां पासून चाललेला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासन मध्ये विलागिकरण व्हावे.या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्याचा बेमुदत संप सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर .मंत्री.गिरीश महाजन तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांच्या कडून सर्व एसटी कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
या वेळी एसटी कर्मचारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच .गिरीश महाजन यांच्या आदेशाने प्रत्येक वार्ड मध्ये असो वा ग्रामीण भागात एसटी कर्मचारी यांना कुठली ही मदत लागली तर हक्काने भाजपा पदाधिकारी यांना सांगावी असे आवाहन ता. अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी केले न. प.गटनेते डॉ.प्रशांत भोंडे यांनी तर एसटी कर्मचारी व त्यांच्या परिवाराला जो पर्यंत संप चालू आहे तो पर्यंत मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल ही घोषणा केली.
या वेळी एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व भाजपा ता. अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर माजी जि.प.दिलीप खोडपे सर अमित देशमुख. नवल राजपूत. जे के चव्हाण उपनगराध्यक्ष शरद पाटील सर .अनिस शेख .नाजिम पार्टी .नगरसेवक बाबुराव हिवराळे .धोंडू आप्पा पाटील .कैलास नरवाडे .कमलाकर पाटील .रवींद्र झाल्टे .कैलास पालवे व सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते सर्व एसटी कर्मचारी यांनी आभार व्यक्त केले