जळगाव (प्रतिनिधी) – जीएसटी विभागाचा निरीक्षक असल्याचे सांगत उद्योजकांना वेगवेगळी भीती दाखवत त्यांच्याकडे २० ते ३० लाखांची मागणी करणाऱ्या तोतया जीएसटी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी जळगाव न्यायालयात जामीन झाला आहे.
एमआयडीसी पोलिस स्टेशन मध्ये व्यापारीच्या फिर्यादीनुसार भाऊसाहेब दशरथ ठाकरे या संशयितास खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. त्याला एक दिवस पोलिस कोठडी भेटली होती. त्यांनतर त्याच्या वतीने जामीन अर्ज दाखल केले होते. त्यात पोलिसांचे म्हणणे मांडण्यात आले. सदर गुन्ह्यात काहीही जप्त करायचे नाही तसेच संशयित आरोपी ह्याचेवर कोणतेही गुन्हे दाखल नाही. पोलिसांच्या युक्तिवादात काही मोठे कारण जामीन रद्द करण्यास नसल्याने त्या संशयित आरोपीला कोर्टाने रू २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अटी व शर्ती वर जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने ॲड. कुणाल पवार यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे ॲड. निखिल कुलकर्णी यांनी जोरदार युक्तिवाद केला