जळगांव (प्रतिनिधी) : येथील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शेख जमिल अंजुम मो.शफी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या नाशिक विभागीय समन्वयक पदी निवड झाली आहे. सध्या ते जिल्हा काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी म्हणुन देखील कामकाज पाहत आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या नाशिक विभागीय समन्वयक पदी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश चेअरमन एम.एम.शेख, नाशिक विभागाचे प्रभारी अनीस कुरेशी यांनी जमिल शेख यांच्या नियुक्तीचे पत्र दिले. त्यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील,प्रदेश जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदिया, उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस आ.शिरीष चौधरी, प्रदेश सचिव डी.जी.पाटील, जिल्हा परिषद गट नेते प्रभाकर सोनवणे, प्रमुख पदाधिकारिंसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.







