राज्य शासनाचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी रायगड येथील जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांची जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी पद हे अनेक महिन्यांपासून रिक्त होते. मिलिंद दीक्षित यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. प्रभारी अधिकारी म्हणून गुरुदत्त चव्हाण हे कामकाज पाहत होते. अखेर या पदावर राज्य शासनाने रविंद्र नाईक यांची नियुक्ती केली आहे.