जळगांव (प्रतिनिधी) :- कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड (धान्य मार्केट) मध्ये दि. ३० रोजी नवीन हंगामातील हरभरा व तुवर या शेतीमालाचे जाहिर लिलावास सुरुवात झालेली आहे. त्यानुसार बाजार समितीचे मुख्य वार्ड (धान्य मार्केट) मध्ये सुहास ट्रेडर्स, का.ना. महाजन, विशाल ट्रेडर्स, राज कापरिशन, कृष्णा ट्रेडर्स, भगुलाल मोतिलाल, शिंदे & चौधरी, के.व्ही.ट्रेडर्स, एकवीरा ट्रेडर्स, म.ध.जैन यांचे फर्मवर हरभरा व तुवर या शेतीमालाचा जाहिर लिलाव घेण्यात आला.
सदरील जाहिर लिलावामध्ये बाजार समितीचे सभापती शामकांत बळीराम सोनवणे, संचालक दिलीप कोळी, मनोज चौधरी, गोकुळ चव्हाण, पंकज महाजन, अशोक राठी व सचिव प्रमोद काळे,तसेच खरेदीदार तुलसी इन्डस्ट्रीज, दामोदर पुखराज मणियार, कमलकिशोर मणियार, शारदा ट्रेडर्स, चामुंडा ट्रेडर्स, भा.ज.जाखेटे, सुनिल तापडीया इ. खरेदीदार मोठ्या प्रमाणावर व शेतकरी बांधव उपस्थित होते. गुलाबी हरभरा भाव रु.८ हजार ४० व चाफा हरबरा भाव रु. ५ हजार ९२५ पर्यंत होते. तसेच तुवरचे भाव १० हजार १७५ पर्यंत जाहीर लिलावाद्वारे शेतीमालाची विक्री झालेली आहे.
बाजार समितीमध्ये आपला शेतीमाल विक्रीसाठी आणतांना वाळवुन व चाळणी करुन आणावा व जाहीर लिलावाद्वारे चढाओढीमध्ये जास्तीत जास्त बाजार भाव मिळवुन घ्यावा असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.