खान्देश मराठा वधू वर परिचय ग्रुपचा उपक्रम
पाचोरा (प्रतिनिधी) :- जळगाव खान्देश मराठा वधू वर ग्रुपतर्फे जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी महादेव मंदिरास ६० लिटर क्षमतेचे वॉटर कुलर व आर ओ मशीन नुकतेच सप्रेम भेट देण्यात आले. यावेळी जळगाव खान्देश मराठा वधू वर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा गौरी उद्योग समूह वावडदाचे चेअरमन सुमीत पाटील,उपाध्यक्ष किशोर पाटील,सदस्य निलेश पाटील,संदिप पाटील ,साई सुमित पाटील व ग्रुप चे इतर सदस्य उपस्थित होते.
तसेच मंदिर समितीचे जगदीश चौधरी व इतर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी महादेव मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी, सेवेसाठी रोज मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात त्या सर्व भविकांना पिण्याचे थंड व शुद्ध पाणी मिळावे व त्या माध्यमातून भगवान महादेवाची सेवा व्हावी यासाठी वस्तू दिल्याचे ग्रुपतर्फे सांगण्यात आले. मनोगत व्यक्त करताना जळगाव खान्देश मराठा वधुवर परिचय ग्रुपचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य यांनी या माध्यमातून भगवान महादेवाची सेवा करण्याचे भाग्य लाभले असल्याबाबत आनंद व्यक्त केला. या सर्व सेवेसाठी जळगाव खान्देश मराठा वधु वर परिचय ग्रुपचे सर्व ग्रुप ऍडमीन,सदस्य,मान्यवर यांचे सहकार्य लाभले.