एलसीबीची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव एलसीबीच्या पथकाने गोलाणी मार्केटमधील एका दुचाकी चोरीचा छडा लावताना ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यात संशयित विक्रम चव्हाण याला अटक केली असून त्याच्याकडून ४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
जळगांव शहर पो.स्टे.ला यावर्षी मोटार सायकल चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकास गोपनीय बातमीदारामार्फत, विक्रम भिका चव्हाण (रा.वसंतवाडी) हा चोरीच्या मोटारसायकल वापरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यावरून पथकाने विक्रम चव्हाण हा त्याचे घरी असल्याची बातमी मिळाल्यावरून त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयित आरोपीकडून चौकशीत जळगांव शहर पो.स्टे.ला दाखल गुन्ह्यातील मो.सा.(क्र.एमएच १९ डीयू ८२३५) हिरो होंडा स्प्लेंडर, (एमएच १९ इसी ३९६८) होंडा शाईन, (एमएच १९बीबी ६००५) हिरो होंडा स्प्लेंडर प्रो आणि जिल्हापेठ पो.स्टे.ला दाखल गुन्ह्यातील मो.सा.क्र..एमएच २० एफ्क्यू ९७२८) होंडा शाईन अशा ४ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास कामी त्याला ताब्यात घेवून जळगाव शहर पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे. संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.उप.नि.दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, हवालदार अकरम शेख, विजय पाटील, हरिलाल पाटील, प्रविण भालेराव यांनी केली आहे.