जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरामध्ये दुचाकी चोरांचा तपास करीत असताना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने मालेगाव येथील दोघांना व जळगाव शहरातील शाहूनगर येथील एका तरुणाला शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून ४ दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. तसेच मालेगाव येथील प्राणघातक हल्ल्यातील दोघे संशयित असून ते फरार होते. या कारवाईमुळे त्यांचाही शोध लागला आहे.
मोबीन शाहू शकील शाह (वय २०, रा. चमननगर, मालेगाव, जि. नाशिक) दानिश शाह जहीर शाह (वय २०, रा. गांधीनगर, मालेगाव, जि. नाशिक) अमीर उर्फ अमीन शाह जहुन शाह (वय २२,रा. शाहूनगर, जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे.(केसीएन)रविवार दि. १६ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक पोलीस निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, रवींद्र चौधरी, नाईक प्रदीप चौधरी, रतन गीते, सिद्धेश डापकर, जयेश हटकर असे पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळेला तिघेही संशयित आरोपी हे पथकाला दिसले.
त्यांनी त्यांना थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून ४ दुचाकी मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे.(केसीएन)तसेच आझाद नगर पोलीस स्टेशन, मालेगाव येथे एका इसमाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे दाखल गुन्ह्यात मालेगाव येथील दोघे फरार होते. सदर दुचाकी चोरीचे गुन्हे एमआयडीसी पोलीस स्टेशन, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, मालेगाव शहर पोलीस स्टेशन यासह आणखी एका ठिकाणी गुन्हा दाखल आहेत.