जळगाव ( प्रतिनिधी ) – दिवाळीनिमित्त जळगावातील महापालिकेच्या संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रासाठी २ फ्रीज , मिठाईची देणगी बिरबलराम शर्मा , नंदकिशोर शर्मा , योगेश शर्मा व रवींद्र शर्मा यांच्यातर्फे नुकतीच देण्यात आली .
आधी या संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील वृद्धांना अभ्यंगस्नान घालून त्यांच्या करमणुकीसाठी नयन मोरे यांनी गिटारवादन आणि तेजस निंबाळकर यांनी नृत्य केले त्यांनतर मिठाईचंही वाटप करण्यात आलं .
यावेळी संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी , शीतल धनगर , महापालिकेच्या गायत्री पाटील , वैभव चौधरी , राहुल पवार , गणेश सोनवणे उपस्थित होते .
या बेघर निवारा केंद्रातील वृद्धांच्या आरोग्यासाठी आणि वैद्यकीय सुविधांसाठी समाजातील दानशूरांनी पुढे यावे असे आवाहन यावेळी बिरबलराम शर्मा , नंदकिशोर शर्मा , योगेश शर्मा व रवींद्र शर्मा यांनी केले.