जळगाव (प्रतिनिधी) : – येथील रामेश्वर कॉलनी व एम जे कॉलेज परिसरात अमळनेर येथे होणाऱ्या 18 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या प्रचारासाठी संमेलनाचे कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत विद्रोही साहित्य संमेलन जिंदाबाद, फुले ,शाहू ,आंबेडकराचा विजय असो, शोषित वंचिताचा आवाज बुलंद करा ,साहित्य संमेलन यशस्वी करा असे जोरदार घोषणा देण्यात आल्या.
प्रचार फेरीत समाधान सोनवणे, संजय बागुल, पंकज सोनवणे, वाल्मिक सपकाळे, प्रा. ईश्वर वाघ, अविनाश तायडे, प्रा प्रीतीलाल पवार, डॉ मिलिंद बागुल, बापूरावं पानपाटील, सत्यजित बिऱ्हाडे, अजित भालेराव,भारत सोनवणे, किरण सोनवणे, पंडित सपकाळे , युवराज सुरवाडे, चंद्रमणी सोनवणे, सुकदेव तायडे, दिलीप सपकाळे, दिलीप त्रंबक सपकाळे, दिलीप अहिरे, महेंद्रकेदारे , भाऊराव इंगळे, राहुल मोरे, जयपाल धुरंधर आदी कार्यकर्ते उपस्थित होते .