जळगावच्या एमआयडीसीतील गुरांच्या बाजारासमोर देवांश सेल्स या नावाने सील बंद शुध्द पाण्याच्या बाटल्यांचा कारखाना सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे व नाशिक विभागाचे सहआयुक्त सं.भा.नारगुडे यांना मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी शरद म. पवार यांनी सहकार्यांसोबत शुक्रवारी या ठिकाणी धाड टाकली. अन्न परवान्याचे सादरीकरण कंपनी मालकाला करता आले नाही.
या ठिकाणी उत्पादित झालेल्या बाटल्यांची जळगाव शहर, जिल्हा व गुजरातमध्ये विक्री केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या बाटल्यांवरही गुजरात पॅकींग असा उल्लेख असून याची सखोल चौकशी केली जात आहे.