जळगाव ( प्रतिनिधी ) – शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीला आली तरूणावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबियासह वास्तव्याला आहे. रविवारी रात्री मुलगी घरात असतांना संशयित आरोपी सागर युवराज गवळी तिच्या घरात घुसला. अल्पवयीन मुलीच्या आईची ओढणी ओढली. मुलगी सोडविण्यासाठी गेली असता सागर गवळी याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला. आई व मुलीला अश्लिल शिवीगाळ करून अत्याचार करण्याची धमकी दिली. सोमवारी सायंकाळी पिडीत अल्पवयीन मुलगीने शनीपेठ पोलीसात तक्रार दिली. तक्रारीवरून संशयित आरोपी सागर गवळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.