• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

कर्तव्य सांभाळून नाट्यकला जोपासणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा  सन्मान

जळगाव  ( प्रतिनिधी ) –  नाटक अनेक कलांचा संगम आसते. अभिनय, संगीत, आशय, रंग आणि वेशभूषा, त्यात सामावलेल्या आहेत. ‘रिटेक’ ची कुठलीही व्यवस्था नसलेले नाटक हे इतर माध्यमांच्या तुलनेत अवघड आहे. तरीही विजेसारख्या अत्यंत कठीण आणि अतिमहत्त्वाच्या क्षेत्रात आपले कर्तव्य बजावून महावितरणचे कर्मचारी नाट्यकला जोपासतात. याचा अभिमान वाटतो. अशा शब्दात कौतुक करीत महावितरणचे संचालक (मानव  संसाधन) राजेंद्र पवार यांनी स्पर्धेत सहभागी नाट्यकलावंतांचा सन्मान केला.

जळगाव शहरात महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत असणाऱ्या परिमंडलाच्या नाट्यस्पर्धा संपन्न झाल्या. शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात झालेल्या स्पर्धेत जळगाव परिमंडलाचे (झेंडा रोविला), भांडूपचे (कुसुम मनोहर लेले), रत्नागिरीचे (आवर्त), नाशिकचे (दानव), सांघिक कार्यालय मुंबईचे (मोक्षदाह) व कल्याण परिमंडलाचे (टर्निंग पॉईंट), ही सहा नाटके सादर झाली. शुक्रवार दिनांक २०जून रोजी स्पर्धेचा पारितोषिक वितरणाने समारोप झाला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे संचालक राजेंद्र पवार उपस्थित होते.

त्यांच्यासमवेत व्यासपीठावर मुख्यालयातील चाचणी विभागाचे मुख्य अभियंता डॉ. मनिष वाठ, जळगावचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, अधीक्षक अभियंता विनोद पाटील, निरज वैरागडे, मनोज विश्वासे, नाट्य परीक्षक प्राचार्यडॉ. शशिकांत चौधरी, अर्चना राज कुबेर, सह मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी राम गोपाल आहीर, सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक केदारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आय. ए. मुलाणी यांनी केले.

प्रमुख पाहुणे  राजेंद्र पवार यांच्या हस्ते नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्या संघ आणि नाट्यकलावंतांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेत अनिरुद्ध रांजेकर लिखित ‘ आवर्त’ हे नाटक प्रथम पुरस्काराने सन्मानित झाले. रत्नागिरी परिमंडळातर्फे ते सादर करण्यात आले होते. नाटकाची निर्मिती अनिल डोये यांची होती. निर्मिती मधील दुसरे पारितोषिक संजय पाटील निर्मित भांडुपच्या ‘कुसुम मनोहर लेले’  या नाटकास मिळाले.  दिग्दर्शनासाठी प्रथम राजू पुणेकर यांना ‘आवर्त’ या रत्नागिरीच्या नाटकास तर द्वितीयपुरस्कार भांडूपच्या ‘कुसुम मनोहर लेले’ साठी चंद्रमणी मिश्रा यांना मिळाले. अभिनयात पुरुष प्रवर्गात दुर्गेश जगताप (रत्नागिरी – आवर्त), प्रथम तर द्वितीय देववृत्त पवार यांना (भांडूप – कुसुम मनोहर लेले) मिळाले. स्री अभिनयासाठी प्रथम रूपाली पाटील (भांडूप – कुसुम मनोहर लेले) तर द्वितीय पारितोषिक श्रद्धा मुळे (रत्नागिरी – आवर्त) यांना देण्यात आली.

नेपथ्यसाठी प्रथम राजेंद्र जाधव (रत्नागिरी – आवर्त), तर द्वितीय श्रीधर शिंदे (सांघिक कार्यालय मुंबई – मोक्षदाह), यांना देण्यात आले. प्रकाश योजनेसाठी प्रथम प्रणाली निमजे (रत्नागिरी – आवर्त), तर द्वितीय संदीप संकपाळ, (भांडुप – कुसुम मनोहर लेले) यांना देण्यात आले. संगीत योजनेसाठी प्रथम नितीन देसाई (रत्नागिरी – आवर्त), तर व्दितीय रवींद्र चौधरी (जळगाव – झेंडा रोविला) यांना देण्यात आले.रंग व वेशभूषेसाठी प्रथम पारितोषीक आशिष कासार (जळगाव – झेंडा रोविला) तर द्वितीय पुरस्कार श्रीमती नमिता गजधर (भांडूप – कुसुम मनोहर लेले) यांना देण्यात आले.

उत्तेजनार्थ मध्ये देववृत्त पवार (भांडूप – कुसुम मनोहर लेले) सचिन पुरव (नाशिक – दानव), अनुराधा गोखले (रत्नागिरी – आवर्त), विजेंद्र भोवड (सांघिक कार्यालय मुंबई – मोक्षदाह), सायली संन्याशी (कल्याण परिमंडळ – टर्निंग पॉईंट), प्रणिता शिंदे (जळगाव – झेंडा रोविला) यांना देण्यात आले. कर्मचारी लेखन प्रवर्गातून ग्यानेश पाटील यांना टर्निंग पॉईंट या नाटकासाठी पारितोषिक देण्यात आले. तर बालकलाकार प्रवर्गातून आर्णव बनसोडे (कल्याण – टर्निंग पॉईंट), नित्यश्री पाटील (कल्याण – टर्निंग पॉईंट), पूर्वा जाधव (जळगाव – झेंडा रोविला) व स्वरांगी साळीस (जळगाव – झेंडा रोविला) साठी देण्यात आले.


 

 

Tags: 'कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम
Previous Post

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

Next Post

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon