विविध राज्यातून संघ सहभागी होणार
महावितरणचे संचलन व प्रकल्प विभागाचे संचालक सचिन तालेवार, वित्त संचालक अनुदीप दिघे, वाणिज्यक संचालक योगेश गडकरी, मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते व कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यस्पर्धेचे १८ जून रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी असणार आहेत. कार्यक्रमास कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता सर्वश्री चंद्रमणी मिश्रा, भांडुपचे संजय पाटील, रत्नागिरीचे अनिल डोये, नाशिकचे सुंदर लटपटे यांच्यासह मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
जळगाव शहरात होणाऱ्या परिक्षेत्रिय नाट्यस्पर्धेत जळगाव परिमंडलाचे ‘झेंडा रोविला’, दि.१८ जून रोजी सकाळी ११ वाजता, भांडूपचे ‘कुसूम मनोहर लेले’, दुपारी ३ वाजता दि.१९ जून रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरी परिमंडलाचे ‘आर्वत’, दुपारी नाशिकचे ‘दानव’, दि.२० जून रोजी सांघिक कार्यालयातर्फे सादर होणारे ‘मोक्षदाह’ हे नाटक सकाळी ११ वाजता तर दुपारी ३ वाजता कल्याण परिमंडलाचे ‘टर्निंग पॉईंट’ हे नाटक होईल. २० जून रोजी सायंकाळी ५ वाजता पारितोषीक वितरणाने नाट्यस्पर्धेची सांगता होईल. असे जळगाव परिमंडल कार्यालयातर्फे कळविले आहे.