जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव येथील मुमुक्षु बहिण सुश्री सिद्धिजी सचिनजी बोरा या दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राजस्थानमधील देशनोक येथे आचार्य भगवंत १००८ पूज्य श्री रामलालजी महाराज साहेब यांच्या मुखातून भगवती दीक्षा स्वीकारणार आहेत. या पवित्र प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान विविध दीक्षा-पूर्व कार्यक्रम रंगणार आहेत.
दि. ३ ऑक्टोबर रोजी कुमकुम-केसर, छाटना आणि मेहेंदीचा सोहळा, त्यानंतर दि. ४ ऑक्टोबर रोजी भक्तिभावाने नटलेला गुरु भक्ति संगीत कार्यक्रम, तर दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता नवी पेठ येथील राहते घरातून खानदेश सेंट्रलपर्यंत भव्य वरघोड़ा मिरवणूक काढण्यात येईल. याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता मुमुक्षु अभिनंदन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या तीन दिवसांत जळगावात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळणार असून, सकल जैन समाजाला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन सकल जैन समाज जळगाव तर्फे करण्यात आले आहे.