खेडी शिवार परिसरात चोरट्यांचे लक्ष्य
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडी शिवार परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेचा समावेश आहे.

तक्रारदार संदीप अशोक पाटील (वय ३७, रा. मनुमाता नगर, खेडी शिवार) हे दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, दि. १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ च्या दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून एकूण किंमत ४ लाख ०६ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.
याप्रप्रकरणी संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करीत आहेत. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.








