जिल्हा बुद्धिबळ संघटनासह जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांचे आयोजन
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११ वर्षांखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेतून गौरव बोरसे (जळगाव), देवांक लढ्ढा (चाळीसगाव), तसेच मुलींमध्ये ज्ञानवी भारंबे आणि भाग्यश्री सूर्यवंशी यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कांताई सभागृहात ७ जून, शुक्रवारी (आज) पार पडलेल्या या निवड चाचणी स्पर्धेत एकूण सहा फेऱ्या घेण्यात आल्या, ज्यात जिल्ह्यातील २९ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन मुले आणि दोन मुलींची निवड करण्यात आली.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू
* मुले: गौरव जितेंद्र बोरसे, देवांक लढ्ढा
* मुली: ज्ञानवी भारंबे, भाग्यश्री सूर्यवंशी. हे पुणे येथे १३ ते १५ जून २०२५ या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत हे खेळाडू जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
उत्तेजनार्थ मेडल प्राप्त खेळाडू
* मुली: सिया ललवाणी, हर्षिका पाटील
* मुले: श्रीराज वानखेडे, हिमांशू बाविस्कर, आर्यन अग्रवाल, युवान असावा, मृगांक पाटील, अभंग सोनवणे, आरव थेपडे, अद्विक मित्तल, ध्रुव जगताप, रणनजय सिंग राजपूत, अवनीश दलाल, यज्ञेश जगदाळे, उत्कर्ष वानखेडे, श्रावण जाधव, झेनल शेख, रियांश ललवाणी.
या स्पर्धेत प्रवीण ठाकरे, नथू सोमवंशी, आकाश धनगर आणि संजय पाटील यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. पारितोषिक वितरण सोहळा महाराष्ट्र बुद्धिबळ तथा जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार अरविंद देशपांडे, सहसचिव संजय पाटील, पद्माकर करणकर, रवींद्र धर्माधिकारी, नथु सोमवंशी यांच्या हस्ते पार पडला. सर्व विजयी खेळाडूंचे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.