जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील तळेले कॉलनीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दिनांक २३ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही अल्पवयीन मुलगी आईवडील व लहान बहिण यांच्यासह वास्तव्याला होती. दरम्यान, रविवारी २३ जून रोजी तिचे वडील हे कामाला निघून गेले. त्यावेळी आई आणि लहान बहिण हे घरी असतांना हिने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.
मुलीने आत्महत्या केली ही बाब तिच्या आईच्या सकाळी ८ वाजता लक्षात येताच त्यांनी एकच आक्रोश केला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली