जळगांव ( प्रतिनिधी ) – सध्याच्या संगणक व इंटरनेटच्या युगातही वीरशैव लिंगायत गवळी समाजात दिवाळी पाडवा व बलीप्रतिपदा (रेडा, म्हशी पूजन) सगर पूजनाची परंपरा कायम आहे.
महाभारत काळात कृष्णानी गोवर्धन पर्वत उचलून गवळी समाजाच्या पशुधनाचे संरक्षण केले होते.तेव्हापासुन सगर पूजनाची (रेडा, म्हशी पूजन) सुरवात झाली आहे असे जाणकार सांगतात.
समाजात अघटित संकट येऊ नये म्हणून गाई-म्हशी लक्ष्मीचे स्वरूप आणी यम राजाचे वाहन रेडायांचे दिवाळी पाडव्या निमित्त सगर पूजन केले जाते.वीरशैव लिंगायत गवळी समाज म्हैस व रेड्याच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठी ही परंपरा आजही जोपासत आहे. दिवाळी पाडव्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी गवळी समाज बांधव एकत्र जमतात. रेड्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. जळगांव शहरात मोहाडी रोड परिसर तसेच शिरसोली गवळी वाडा परिसरात वीरशैव लिंगायत गवळी समाज दैव पंच मंडळ व समाज बांधवांकडून हा सण साजरा करण्यात आला. यावेळी वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुद्देशीय संस्थेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष दिपक जोमीवाळे, युवा प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा गठरी,जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश लंगोटे, सचिव नारायणराव बारसे, सह सचिव अशोक जोमीवाळे, शंकर काटकर, विशाल बारसे, जेष्ठ पंच भागवत बारसे, साहेबराव बारसे आदी उपस्थित होते.