जळगावला राष्ट्रीय महामार्गावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात असताना एका दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीस्वार तरुणाला जबर धडक दिल्याने तो जबर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दि. २ जुलै दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ येथे आयएमआर महाविद्यालयाजवळ झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला नोंद नव्हती.
विशाल विनोद भोई (वय २०, रा. चंदूआण्णा नगर, जळगाव) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. विशाल भोई या विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्याने तो दुचाकीने मू.जे. महाविद्यालयात जात होता.आयएमआर महाविद्यालयाजवळ आला असताना तेथे एका दुचाकीस्वाराने अचानक वळण घेतले. त्यावेळी धडक झाल्याने विशाल दुचाकीवरून खाली पडला. त्यात त्याला दुखापत झाली. नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सदर घटनेची जिल्हापेठ पोलीस स्टेशनला कुठलीही नोंद नव्हती.