जळगाव ते शिरसोलीदरम्यानची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यात जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या रेल्वे रूळावर एका ७३ वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आला. सुरूवातील अनोळखी म्हणून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. नंतर ओळख पटविण्यात आली. बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सुरेश धर्मा पाटील (वय ७३ रा. अजिंठा हाऊसिंग सोसायटी, जळगाव) असे मयत वृध्दाचे नाव आहे. जळगाव ते शिरसोली रेल्वे रूळावरील रेल्वे खंबा क्रमांक ४१५ जवळ एका मंगळवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारा छपरा एक्सप्रेस समोर सुरेश पाटील हे आल्याने त्यांचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला होता. लोको पायलट एस.एस.निंबाळकर यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातीला अनोळखी म्हणून जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पंचनामा करून मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला होता. मयत हे सुरेश पाटील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे करीत आहे.