जळगाव (प्रतिनिधी) – येथील सायकलिस्ट असोसिएशनतर्फे जळगाव ते शेगाव सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते. वारीत ५० पेक्षा अधिक सदस्यांनी सहभाग घेतला. यानंतर खामगाव, नांदुरा, शेगाव येथे त्यांचे स्वागत केले.
हि वारी श्री गजानन महाराज मंदिर,शिरसोली रोड, गुंजन मंगल कार्यालय जवळून सुरु झाली आणि संध्याकाळी ५;३० ला शेगाव येथे पोहोचली. खामगाव आणि नांदुरा सायकलिंस्ट्सचे सदस्य यांनी वारीत सहभागी सदस्यांचा सत्कार आणि कौतुक सोहळा आयोजित केला होता.या वारीचे हे पहिलेच वर्ष होते. डॉ. अनघा चोपडे, रुपेश महाजन, राम घोरपडे, अनिकेत पवार यांनी हे आयोजन केले होते. सर्व सदस्यांमध्ये भक्तिमय वातावरण होते. स्त्रियांमध्ये प्रिया पाटील, जया व्यास, धनश्री चौधरी या महिलांचा लक्षणीय सहभाग होता.
धुलिया सायकल कंपनीने पंचर दुरुस्त करणारा तांत्रिक माणूस वारीत सोबत दिला होता. तसेच वैद्यकीय उपचारासाठी एक टीम आणि फर्स्ट एडची सुविधा डॉ. सुयोग चोपडे आरोग्यम क्लिनिक यांनी उपलब्ध करून दिली होती. सायकलवारीचे आयोजन करण्याआधी राईड मॅपिंग करून हायड्रेशन पॉईंट ठरविण्यात आले होते. अण्णकुटी शेगाव येथे पी. एल. आमले, अॅड. सुचिता आमले यांनी स्वागत केले. त्यानंतर गजानन महाराज दर्शन घेऊन महाप्रसाद घेण्यात आला. प्रशांत गुरव यांनी पुस्तके वाटप करून ज्ञान प्रचाराचा संदेश दिला. रॅलीत ८ विचा विराट चोपडेंपासून ६५ वर्षांचे रविंद्र आगाशे यांचाही समावेश होता. प्रतापराव पाटील आणि राहुल परकाळे यांनी सर्व सायकलिस्ट सदस्यांना शुभेच्छा दिल्या.