जळगाव (प्रतिनिधी) – येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात मंथन २०२० या वार्षिक स्नेहसंमेलनाचा विविध कार्यक्रमांनी थाटात समारोप करण्यात आला. डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात आयोजीत मंथन २०२० वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाला
अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकुर हे होते. सुरवातील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. स्नेहसंमेलनातंर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. तसेच कबड्डी, बुध्दीबळ, कॅरम, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, क्रिकेट या स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच साडी डे, चॉकलेट डे, सिग्नेचर डे, टाई डे, अंताक्षरी या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना समारोपीय समारंभात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्नेहसंमेलनात हिंगणघाट येथील घटना, महिला अत्याचार, स्वच्छता असे सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. माजी विद्यार्थी कल्पेश बागल याने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातुन जलसंधारणाच्या कामांची माहिती दिली. कल्पेश बागल याचा महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी रक्तदान शिबिरही घेण्यात आले. यशस्वीतेसाठी प्राचार्य एस.एम. पाटील, सहायक कुलसचिव अतुल बोंडे, प्रा. मोनिका भावसार, प्रा. बी.बी. मुंढे, प्रा. ए.बी. पासेकर, प्रा. अतुल पाटील, विद्यार्थी प्रतिनीधी मयुर सोनवणे, विद्यार्थीनी प्रतिनीधी कोमल पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.