रामानंद नगर पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे गुरुवार दि. १८ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना त्यांना दोन संशयित इसम दिसून आले. त्यांच्याकडे चोरीच्या दुचाकी सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आले आहे.
रामानंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल जितेंद्र गुरुमक राठोड (वय ५० वर्ष), सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार हे गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गस्त घालत होते. त्यावेळेला रायसोनी नगर येथे शुक्रवारी रात्री १ वाजेच्या सुमारास दोन संशयित इसम हे दोन दुचाकीवर अंधारात फिरताना दिसले. (केसीएन)त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव प्रेम संजय बडगुजर (वय २०, रा. अयोध्या नगर, जळगाव) व अविनाश दिनकर बागुल (वय २७, रा. नगरदेवळा ता. पाचोरा) असे सांगितले.
त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच संशयित प्रेम बडगुजर याच्याकडील पल्सर वाहन (एमएच १९ डीजी ८०५०) आणि संशयित अविनाश बागुल यांच्याकडील पल्सर वाहन (एमएच ०२ टीजी ४९४१) या दोन्ही वाहनबाबत विचारपूस केले असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. (केसीएन)यातील एक दुचाकी रामानंदनगर हद्दीतील चोरीची असून दुसरी मुंबई येथील चोरीची आहे. पोलिसांनी दोघं संशयित इसमांना अटक केली असून हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुचाकी चोरांकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.