जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात मंगळवारी ( १८ जानेवारीरोजी ) दिवसभरात ४०९ बाधित रूग्ण आढळून आले आहेत . तर १८० बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.
जळगाव शहर- १५९ , जळगाव ग्रामीण- १८ , भुसावळ – १०६ , अमळनेर- ०५ , चोपडा- ४३ , पाचोरा – ०९ , भडगाव – १३ , धरणगाव – ०६, यावल- ०१ , जामनेर- ०५ , एरंडोल – ०२ , रावेर- ०४ , पारोळा – ०९ , चाळीसगाव – ०७ , मुक्ताईनगर – २० , बोदवड – ० , आणि इतर जिल्ह्यातील ०२ असे एकुण ४०९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार ७८५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ७२६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या २४७८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.