जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात रविवारी ( १५ जानेवारीरोजी ) दिवसभरात ३५४ बाधित रूग्ण आढळून आले आहेत . तर ७९ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.
जळगाव शहर- १०८ , जळगाव ग्रामीण- १२ , भुसावळ – १३२ , अमळनेर- १९ , चोपडा- १९ , पाचोरा -० , भडगाव -०३ , धरणगाव -० , यावल- ०२ , जामनेर-१० , एरंडोल -०४ , रावेर- ०६ , पारोळा -१२ , चाळीसगाव – १४ , मुक्ताईनगर – ०६ , बोदवड -०७ , आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण ३५४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४५ हजार १५९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ४५८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या २१२१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.