जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात शनिवारी १५ जानेवारीरोजी दिवसभरात ३७७ बाधित रूग्ण आढळून आले आहेत . तर ४६ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.
जळगाव शहर- १५५ , जळगाव ग्रामीण- ०९ , भुसावळ – १४४ , अमळनेर-१३ , चोपडा- १५ , पाचोरा -०१ , भडगाव -०७ , धरणगाव -०१ , यावल-०२ , जामनेर-०२ , एरंडोल -०३ , रावेर- ०३ , पारोळा – ०१, चाळीसगाव – २० , मुक्ताईनगर -० , बोदवड -० , आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे एकुण ३७७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ८०५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ३७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १८४६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही .