जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : दुकानावर पायी जात असलेल्या तरुणाला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात सागर प्रभाकर ताजणे (वय २९, रा. कोनगाव, ता. कल्याण, जि.ठाणे) हा जखमी झाला. ही घटना दि. ११ रोजी रात्री साडेआठ वाजता ट्रान्सपोर्टनगरजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कोणगाव येथे सागर प्रभाकर ताजणे हा वाहनावर चालक आहे. दि. ११ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तो दुकानावर जात असतांना समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सागर प्रभाकर ताजणे हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याने एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ विजय पाटील हे करीत आहे.