जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील सुप्रिम कॉलनीत दोन महिन्यांपासून बाकी असलेले घरभाडे मागितल्याचा राग आल्याने भाडेकरुने घरमालकाच्या डोक्यात दगड मारुन जखमी केल्याची घटना बुधवार, १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , सुप्रिम कॉलनी परिसरात सेवालाल चौकात संजय रघुनाथ कोळी वय ४५ हे वास्तव्यास आहेत. याच परिसरात असलेले घर त्यांनी गुणवंत विठोबा कोळी यास भाड्याने दिले आहेत. बुधवारी सायंकाळी संजय रघुनाथ कोळी यांनी दोन महिन्यांचे घरभाडे बाकी असून ते घरभाडे द्यावे असे गुणवंत कोळी यास सांगितले. घरभाडे मागितल्याचा राग आल्याने गुणवंत कोळी याने दारुच्या नशेत शिवगाळ तसेच दमदाटी करत संजय कोळी यांच्या डोक्यात दगड मारुन दुखापत केली. या मारहाणीत संजय कोळी हे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुणवंत कोळी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र उदेसिंग पाटील हे करीत आहेत.