• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जैन इरिगेशनचा क्रिकेट संघ अंतिम विजेता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जैन इरिगेशनचा क्रिकेट संघ अंतिम विजेता

मुंबईच्या टाईमशील्ड स्पर्धेच्या ‘अ’ गटात अव्वल, मुंबई कस्टम्स संघावर मात

जळगाव, (प्रतिनिधी) –  भारतातील अग्रगण्य मानली जाणारी मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित आंतरकार्यालयीन ‘अ’ गट स्पर्धेचा अंतिम सामना जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. विरूद्ध मुंबई कस्टम्स यांच्या दरम्यान दि. २७, २८, २९ मार्च २०२४ रोजी मुंबई स्थित बांद्र-कुर्ला संकुलाच्या मैदानावर खेळला गेला.

मुंबई कस्टम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला, आपल्या कर्णधाराचा निर्णय सुयोग्य ठरवताना मुंबई कस्टम संघाने अप्रतिम गोलंदाजी करीत जैन इरिगेशन संघाला १४५ धावांत रोखले. यात जयस्वाल याने ४० धावात ५ बळी, तर चव्हाण याने ३२ धावात ४ बळी मिळवीले. जैन संघाचा आघाडीचा फलंदाज शाश्वत जगताप याने सर्वाधिक ४९ धावा केल्या. त्याला राॅयस्टन डायस याने २१ धावांचे योगदान दिले.

१४५ धावांचा पाठलाग करणारा मुंबई कस्टम संघ फलंदाजीत विशेष चमक दाखवू शकला नाही. जैन संघातील जळगावचा खेळाडू शशांक अत्तरदे याने अत्यंत भेदक अशी ऑफस्पीन गोलंदाजी करताना मुंबई कस्टम संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडीत केवळ ३७ धावांत ७ बळी मिळविल्या. तर जळगावच्याच जगदिश झोपे याने सुद्धा २ महत्त्वपुर्ण बळी मिळवीत शशांक याला उत्तम साथ दिली व मुंबई कस्टम संघाला १२५ धावांवर गुंडाळून २० धावांची महत्त्वपुर्ण आघाडी घेतली.

आपल्या दुसऱ्या डावात फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत जैन संघाचा कर्णधार जय बिस्टा याने नाबाद २०१ धावा केल्या. तर सुवेद पारकर याने ११२ धावांचे योगदान दिले. व जैन इरिगेशन संघाने एकुण ३ बाद ३७९ धावांवर आपला डाव घोषित केला.

मुंबई कस्टम्स संघाने आपला पराभव मान्य करीत हा अंतिम सामना जैन इरिगेशन संघाला बहाल केला.

जैन इरिगेशन संघ खालीलप्रमाणे –

१) जय बिस्टा २) शाश्वत जगताप ३) मनन भट ४) सुवेद पारकर ५) आयुष झिमरे ६) साईराज पाटील

७) राॅयस्टन डायस ८) विजय गोयील (सर्व मुंबई) ९) सुरज शिंदे (पुणे)

१०) शशांक अत्तरदे ११) जगदिश झोपे (जळगाव)

प्रशिक्षक – १) समद फल्ला (पुणे), २) अनंत तांबवेकर (सांगली)

मार्गदर्शक – मयंक पारिख (मुंबई)

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. या कंपनीने  खेळाडूंना सदैव पाठबळ देण्याचे धोरण राबविले आहे. क्रीडापटुंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कंपनीद्वारे अनेक वर्षांपासून आपला क्रिकेट संघ मुंबईतच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘टाईमशील्ड’ या आंतर कार्यालयिन क्रिकेट स्पर्धेत २०१० पासून सातत्याने सहभागी होत आहे. मागील काही वर्षांपासून या संघाचा समावेश ‘अ’ गटात झालेला आहे. आजपावेतो या संघाने सन २०१४ व आता २०२४ मध्ये ‘अ’ गटाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवित दुसऱ्यांदा टाईमशील्ड चषक आपल्या नावे केला आहे. संघातील सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन करताना विशेष अभिमान व आनंद वाटत आहे. आमची कंपनी सर्वच प्रकारच्या खेळांना व खेळाडूंना आपला सक्रिय पाठिंबा देत आली आहे व भविष्यात देखील खेळाडूंच्या उन्नतीसाठी कटिबद्ध राहू याची ग्वाही पण या विशेष प्रसंगी देतो.

अतुल जैन

सहव्यवस्थापकीय संचालक

जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि.


 

 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jain-irigetion-criket-sangh-vijeta/
Previous Post

जामनेर,चाळीसगाव तालुक्यातील दोघे स्थानबद्ध : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next Post

भुसावळ शहरात घरफोडी, ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

भुसावळ शहरात घरफोडी, ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon