अशोक जैन यांच्या दातृत्वाने जखमी तरुणाचे कुटुंबीय भारावले
जळगाव (प्रतिनिधी ) – चार दिवसाआधी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचा एक तरूण निरपराध विद्यार्थी हायवेवर मित्रासोबत उभा असतांना ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी होतो,अत्यंत नाजुक आर्थिक परिस्थिती असणारे पालक मदतीसाठी विनवण्या करतात,सोबतचे मित्र लोक वर्गणीतून उपचार सुरू करतात,त्यातच मदतीसाठी सोशल मिडीयावर आवाहन सुरू होते.
जळगावच्या दातृत्वाचा, जळगावच्या संवेदनशीलतेचा अनुभव परत एकदा समोर आला.आजवर अनेक दानशूर व्यक्तींनी अक्षरशः या खचलेल्या कुटुंबाला आधार देण्यात मागेपुढे पाहीले नाही. आंतरराष्ट्रीय नामांकित जैन इरिगेशन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन,अतुलभाऊ जैन यांनी एक लाखाचा चेक हाॅस्पीटलच्या नावे पाठविला.तसेच या मुलाचे पालक व विद्यार्थी यांची भोजन व्यवस्था केली.तसेच या मुलाच्या पुढील उपचारासाठी देखील पुढाकार घेण्याचे कळविले.अनिल जोशी यांनी या संदर्भात माहीती दिली तसेच पालक व मित्र परिवार यांना आधार देत आत्मबळ दिले. सर्व विद्यार्थी या विद्यार्थीचे पालक व वैयक्तिक आम्ही सर्व कार्यकर्ते कडून अशोक जैन, अतुल जैन यांचे मनापासून आभार मानले
जळगाव सोन्यासाठी प्रसिद्ध होते ,परंतु इतके मोठे दातृत्व असणारी सोन्यासारखी माणसं जळगावात आहेत याचा अनुभव आम्ही घेतोय असा उल्लेख या विद्यार्थ्यांचे पालकांनी बोलुन दाखवीला.