जळगाव ( प्रतिनिधी ) – पहिल्या आंतर शालेय जैन चॅलेंज लिग फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलां मध्ये सेंट अलायसिस कॉन्व्हेंट स्कूल भुसावल तर १७ वर्षा खालील मुलांमध्ये डी.एल.हिंदी हायस्कूल भुसावळ व मुलींमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जळगाव विजय
ऑगस्ट महिन्यापासून अनुभूती रेसिडेन्सी स्कूल येथे पहिल्या आंतर शालेय जैन चॅलेंज फुटबॉल लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ९ फेब्रुवारी २०२३ रोजी या स्पर्धेचे अंतिम सामने खेळविण्यात आले.
अंतिम सामन्यानंतर लगेचच पारितोषिक वितरण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टम लिमिट चे अभंग जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे अरविंद देशपांडे व रवी धर्माधिकारी मुख्य प्रशिक्षक अब्दुल मोहसिन यांच्या शुभ हस्ते उपविजयी, विजयी संघाना व उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.
१४ वर्षाखालील मुले
एकुण संघ -१९
लीग स्पर्धा सामने -४०+सेमी फायनल २ व १ अंतिम सामना असे एकूण ४३ सामने खेळण्यात आले
एकुण गोल -९३
सेंट अलायसिस स्कूल भुसावल वि. वि. अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेन्सी स्कूल शिरसोली ३-०.
उत्कृष्ट गोल रक्षक – सेंट अलांसिस स्कूल भुसावल चा *मनीष नन्नवरे
उत्कृष्ट डिफेंडर-सेंट ऑलॉसीस स्कूल भुसावल चा ट्राय रॉबर्ट
बेस्ट स्कोरर-अनुभूती रेसिडेन्सीयल स्कूलचा *आयुष भोर यांनी या स्पर्धेत एकूण ७ गोल केले होते.
स्पर्धेच्या उत्कृष्ट खेळाडू अंजुमन जामनेर उर्दू हायस्कूल चा अरहान खान हा ठरला.
१७ वर्षाखालील मुले
एकुण -२५ संघ
लीग स्पर्धा सामने -५०+सेमी फायनल २ व १ अंतिम सामना असे एकूण ५३ सामने खेळण्यात आले
एकुण गोल -२०५
विजय – डी. एल. हिंदी स्कूल भुसावल वि.वि.अनुभूती रेसिडेन्सीयल स्कूल शिरसोली ३-२
उत्कृष्ट गोल रक्षक – अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेन्सी स्कूल शिरसोली च्यासिंघव- *तनिष सिंघवी
उत्कृष्ट डिफेंडर-डी.एल.हिंदी स्कूल भुसावळ च्या – *सोहेल शेख
बेस्ट स्कोरर – सेंट ऑलॉसीस स्कूल भुसावल चा -ओम पाटील त्यांनी या स्पर्धेत एकूण १२ गोल केले होते.
स्पर्धेच्या उत्कृष्ट खेळाडू -अनुभूती रेसिडेन्सीयल स्कूल शिरसोली चा प्रियम सांगवी ठरला.
१७ वर्षाखालील मुली
एकुण – ८ संघ
लीग स्पर्धा सामने -१६+सेमी फायनल २ व १ अंतिम सामना असे एकूण १९ सामने खेळण्यात आले
एकुण गोल -१२
पोद्दार इंटरनॅशनल स्कूल विजय विरुद्ध गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव २-०.
उत्कृष्ट गोलरक्षक – विद्या इंग्लिश मीडियम ची- *गायत्री पाटील
उत्कृष्ट डिफेंडर -पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ची *स्वरूपा चिरमाडे
बेस्ट स्कोरर-पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ची *साक्षी आघे यांनी या स्पर्धेत एकूण गोल ५ केले.
स्पर्धेचे उत्कृष्ट खेळाडू पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ची – देवांगी पाटील हा ठरली.
या स्पर्धा यशस्वीते साठी पंच म्हणून धनंजय धनगर,कौशल पवार अर्पित वानखडे,पवन सपकाळे वसीम शेख, निखिल पाटील, अमेय तळेगावकर, अरशद शेख,दीपक सस्ते,संजय कासदेकर यांनी काम पाहिले.
या संपूर्ण स्पर्धेसाठी अनुभूती स्कूल ने आपले फुटबॉल मैदान उपलब्ध करून दिले तसेच जैन इरिगेशन सिस्टिम्स ली ने ही संपूर्ण स्पर्धा प्रायोजित केली होती
सर्व उपविवजयी विजयी संघांचे तसेच वैयक्तिक बक्षिसे प्राप्त खेळाडूंचे जैन स्पोर्ट्स अकादमीचे संचालक माननीय श्री अतुल जैन यांनी अभिनंदन केले आहे.