महाराष्ट्र सुवर्णकार सेनातर्फे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र सुवर्णकार सेना आणि अहिर सुवर्णकार महिला मंडळ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन विशेष सन्मान कार्यक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह व पुष्प देवून संपन्न झाला.
महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव आणि अहिर सुवर्णकार महिला मंडळ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, समाजातील कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान करण्याचा एक आगळा-वेगळा उपक्रम यावर्षी घेण्यात आला. शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचारी यांचा कार्यालयात जाऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी महाराष्ट्र सुवर्णकार सेनाचे अध्यक्ष संजय विसपुते यांनी रुग्णालयातील महिला ज्या निष्ठेने अहोरात्र कार्य करत आहेत त्यांच्या कार्याला त्रिवार सलाम असे मत व्यक्त केले.
प्रसंगी अहिर सुवर्णकार महिला मंडळ, जळगावच्या अध्यक्षा रंजना विजय वानखेडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांचे संघटन होणे खुप गरजेचे असून सर्व महिलांनी एका तरी महिला मंडळात सहभाग घेणे गरजेचे आहे.
प्रसंगी अहिर सुवर्णकार महीला मंडळ अध्यक्षा रंजना वानखेडे, उपाध्यक्षा संगीता विसपुते, सचिव राजश्री पगार, कार्यकारी मंडळ सदस्या कविता पगार, अनिता सोनार, सविता मोरे आदी उपस्थित होत्या. महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगावचे अध्यक्ष संजय बाबूराव विसपुते, उपाध्यक्ष विजय केशव वानखेडे, सचिव संजय पगार, इच्छाराम दाभाडे, बबलू बाविस्कर, संजय दुसाने, विशाल विसपुते, सुभाष सोनार, गोकुळ सोनार, प्रशांत विसपुते आदी समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या. प्रसंगी सचिव राजश्री पगार यांनी धन्यवाद व्यक्त केले.