गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव यांच्यातर्फे प्रभावी पथनाट्य सादरीकरण
जळगाव – जागतिक जल दिनाच्या निमित्ताने गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कम्युनिटी हेल्थ डिपार्टमेंट,युथ रेडक्रॉस सोसायटी आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाणी हीच जीवनरेषा या घोषवाक्यावर आधारित या उपक्रमात पथनाट्य सादरीकरण, पोस्टर स्पर्धा, आणि घोषवाक्य प्रदर्शन यांचा समावेश होता.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून पाण्याचे जतन, दूषित पाण्याचे दुष्परिणाम, आणि जलसंधारणाच्या उपायांबाबत प्रभावी सामाजिक संदेश पोहोचवण्यात आला. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे आणि कलात्मक सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.या उपक्रमाचे यशस्वी आयोजन सामुदायिक आरोग्य विभागप्रमुख प्रा. जसनीत दया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. युथ रेडक्रॉस सोसायटी आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सक्रीय सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला.