अमळनेर ;- रोटरी क्लब ऑफ अमळनेर यांच्या मार्फत पूज्य सानेगुरुजी युवा मंच स्पर्धा परीक्षा केंद्राला स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजीत भांडारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे क्लब सेक्रेटरी महेश पाटील उपस्थित होते.तसेच रोटरीचे सदस्य अजय रोडगे पाटील,प्रतिक जैन,ईश्वर सैनानी,ताहा बोहरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गिरीश पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण पाटील यांनी केले.विदयार्थ्यापैकी उमेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अजय रोडगे पाटील यांनी विदयार्थांना प्रेरणात्मक मार्गदर्शन केले.अध्यक्षिय भाषणांत अभिजीत भांडारकर यांनी मुलांना स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले.रोटरीचे सदस्य प्रतिक जैन यांनी वाचनालयासाठी मदत म्हणून रोख ५००/-रु. देणगी दिली.कार्यक्रमाला प्रकाश जगतराव पाटील,रावसाहेब पाटील,नरेंद्र पाटील,सुभाष पवार,देवेंद्र पाटील,दिपक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती आणि मोठया संख्येने विद्यार्थी सुध्दा हजर होते.कार्यक्रमाचे आभार प्रविण पाटील यांनी मानले.








