जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक शिवारातील शासकीय वाळूच्या ठेक्यावरून इन्व्हर्टर व बॅटरी असा एकुण १३ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय माधव तेलंगे (वय ३८, रा. नांद्रा ता.जळगाव) हे नांद्रा बुद्रुक शिवारातील शेत गट क्रमांक ६९ मधील शासकीय वाळूच्या ठेक्याच्या ठिकाणी ते नोकरीला आहे. या वाळूच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले इन्व्हर्टर आणि बॅटरी असा एकुण १३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी विजय तेलंगे यांनी दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक चौधरी हे करीत आहे.