जळगाव ( प्रतिनिधी ) – इंद्रप्रस्थ नगरातील माहेर असलेल्या विवाहितेच्या पालकांकडून सोन्याचे दागिने आणि रोकड घेवून देखील वेळोवेळी पैशांसाठी मारहाण करून त्रास देण्याचे प्रकार इंद्रप्रस्थ नगरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील माहेर असलेल्या शितल वसंत ठाकुर (वय-३८) रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव यांचा विवाह चिराग हरबन्सलाल अरोरा, रा. फरिदाबाद अरोरा, हरीयाणा याच्याशी सन २००८ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या आगोदर चिराग अरोरा याने विवाहितेच्या आईवडीलांना विश्वासात घेवून व लग्नाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून वेळोवेळी सोन्याचे दागिने, रोख पैसे याचे अटी ठेवून लग्न केले. दरम्यान त्यानंतर विवाहितेला पुन्हा वेळोवेळी पैश्यांची मागणी करू लागले. पैसे दिले नाही, तर विवाहितेचा शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासरे, सासु, जेठ, जेठाणी, लहान जेठ यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या.
याप्रकरणी रविवारी ९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात पती चिराग हरबन्सलाल अरोरा, सासरे हरबन्सलाल अरोरा, सासू सरला हरबन्सलाल अरोरा, मोठा जेठ गगन हरबन्सलाल अरोरा, जेठ निकेत हरबन्सलाल अरोरा, जेठाणी ज्योती निकेत अरोरा सर्व रा. फरिदाबाद हरीयाणा यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र पाटील करीत आहे.