• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील ज्योतिषशास्त्र शिकवण्याचा निर्णय कायम ठेवावा – हिंदू जनजागृती समितीची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील ज्योतीषशास्त्राच्या अभ्यासाला काही मूठभर मंडळी विरोध करत असले तरी याला न जुमानता हा अभ्यासक्रम शिकवण्याचा निर्णय कायम ठेवावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाफच्या अंतर्गतज्योतिष शास्त्र हा विषय चालू करण्यात येणार आहे. विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्तुत्य असून ज्योतिष ही भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन विद्या आहे. यावर ज्योतिष विषय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येऊ नये,अशी मागणी काही नास्तिक आणि हिंदु धर्मविरोधी संघटनांनी ज्योतिषशास्त्राचा कोणताही अभ्यास न करता केली आहे. या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने मुठभर ज्योतिषशास्त्र द्वेषी लोकांच्या विरोधाला न जुमानता ज्योतिषशास्त्र शिकवण्याचा निर्णय कायम ठेवावा ! अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे. येथील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना समितीच्या वतीने सर्वश्री गजानन तांबट, राहुल जोशी आणि गोपाळ हटकर यांनी निवेदन दिले.

या निवेदनात विद्यापीठाला आश्वस्त करताना हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे की, आपल्या या निर्णयामुळे आपल्या विद्यापिठाच्या बाजूने समिती खंबीरपणे उभी आहे.वेळ पडल्यास आम्हीफज्योतिष शास्त्राफच्या समर्थनार्थ रस्त्यावरही उतरू.समाजातील बहुसंख्यांक समाजाचा ज्योतिष शास्त्राला पाठिंबा असल्याने ज्योतिष्य शास्त्र हा विषय विद्यापिठात निडरपणे आरंभ करावा.

या निवेदनात ज्योतिष शास्त्राचे महत्व उद्धृत करताना सांगण्यात आले आहे की,

१.ज्योतिषशास्त्राचा हा अभ्यासक्रम विद्यापिठात येऊ नये;म्हणून या पूर्वी अगदी मोठमोठ्या वैज्ञानिकांनी आटोकाट प्रयत्न केले.मुंबई उच्च न्यायालय,नंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालय,यानंतर सर्वोच्च न्यायालय येथेही ज्योतिष शास्त्राला आव्हान दिले गेले. पण सर्वोच्च न्यायालयाने तर वैज्ञानिकांचा दावा फेटाळत ज्योतिष हे विज्ञान आहे,असा निर्वाळाही दिला.तसेच काही थोड्या लोकांनी ज्योतिषाला विरोध केला, म्हणजे विज्ञानयुगात ज्योतिष थोतांड ठरत नाही अशी टिपण्णीही न्यायालयाने केली.त्यामुळे तथाकथित पुरोगामी संघटनांचा याला विरोध हा फोल ठरला आहे.

२.मुंबई उच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने ज्योतिषशास्त्र हे ४०००वर्ष जुने विज्ञान असून यावर बंदी आणली जाऊ शकत नाहीफ असे म्हटले होते.

३.सहा वेदांगांपैकी ज्योतिष हे एक अंग आहे.ऋग्वेदात ज्योतिषशास्त्राचे ३६,यजुर्वेदात४४,तर अथर्ववेदात १६२श्‍लोक आहेत.यावरून ज्योतिषशास्त्राचा वेदांशी दृढ संबंध आहे,हे सिद्ध होते;म्हणून ज्योतिषशास्त्राला खोटे म्हणणे म्हणजे वेद खोटे आहेत असे म्हणण्यासारखे आहे.

४.ज्योतिष हे कालज्ञानाचे म्हणजे काळाची अनुकूलता किंवा प्रतिकूलता सांगणारे शास्त्र आहे.व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून तिचा स्वभाव, जन्मजात लाभलेली कला-कौशल्य-बुद्धी,व्यक्तीला पूरक कार्यक्षेत्र,जीवनाचा एकंदर दर्जा आदी अनेक गोष्टींसंदर्भात उत्तमप्रकारे बोध होतो.आधुनिक विज्ञान सोडवू शकत नाही,अशा अनेक व्यक्तीगत अडचणींसंदर्भात ज्योतिषशास्त्र योग्य दिशादर्शन करते.समाजाला ज्योतिषशास्त्र आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रात तथ्य आहे,म्हणूनच ते प्राचीन काळापासून लाखो वर्षे टिकले आहे.

५.ज्योतिषशास्त्राला विरोध करणारे मानसशास्त्र,तर्कशास्त्र आदी प्रस्थापित शास्त्रांना विरोध करत नाहीत.मानसशास्त्र शिकवतांना त्याची व्याख्या काय आहे?,मनाचे शरीरातील स्थान आजच्या विज्ञानाला माहिती नाही.तरी हे एक प्रगत शास्त्र आहे,हे पुरोगाम्यांना मान्य आहे. आम्हीही याला शास्त्रच मानतो. पण ज्योतिषीय ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा नाही,त्याचे परिणाम आणि अभ्यास करण्याची तयारी नाही आणि ते शास्त्रच नाही अशी मोठी प्रौढी मिरवत आहेत.यातूनच पुरोगाम्यांचा विवेक म्हणजे काय,हे लक्षात येते.

६.दिनांक१६मे२००१ यादिवशी कृषीशास्त्रज्ञ अशोक जोशी यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता.या लेखात पंचांगातील पावसाची भाकिते९०टक्क्यांहून अधिक जुळतात असे विधान त्यांनी केले होते.हे विधान त्यांनी राहुरी कृषी विद्यापिठातील चार-पाच जणांच्या मदतीने संशोधन केल्यानंतर केले होते.आजसुद्धा हवामान खात्याला पावसाचे भाकीत पूर्णपणे नीट सांगता येत नाही.मग हवामान खाते बंद करा,असे सांगायला अंनिसवाले का जात नाहीत?महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर यांनी सांगितले आहे, हजारो कोटी रुपये खर्चूनही हवामानाचा अचूक अंदाज विज्ञान वर्तवू शकत नाही.तरी हवामानशास्त्राला आपण शास्त्रम्हणून मान्यता देत असू,तर ज्योतिषशास्त्राला का नाही?

७.इतकेच नव्हे,तर देशभरातील बहुतांश वृत्तपत्रे त्यांच्या वृत्तपत्रांतून नियमितपणे दैनंदिन, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक प्रकारची राशी-भविष्ये प्रसिद्ध करतात.ती काय अवैज्ञानिकता आणि अंधश्रद्धा पसरवतात,असे समजायचे का? अंनिसवाले अशा वृत्तपत्रांना राशी-भविष्ये छापण्याचे बंद करा असे का सांगत नाही?

८.विज्ञानातील आधुनिक घडामोडी आणि शोध यांच्या दृष्टीकोनातून पारंपरिक ज्योतिषशास्त्राच्या नियमांची मांडणी करून नवीन अभ्यासपद्धत आणि प्रमाणित अभ्यासक्रम सिद्ध करणे,तोे शिक्षक-ज्योतिष्यांना देणे,तसेच विद्यापिठात ज्योतिष विषयाचा अभ्यासक्रम ठरवण्यात ज्योतिषतज्ञांना पुष्कळ प्रमाणात यश मिळाले आहे.त्यामुळे आज भारतात यु.जी.सी.ने(विद्यापीठ अनुदान आयोगाने)हे शास्त्र म्हणून मान्य केले आहे.

९.भारतासह जगभरात ५४ विद्यापिठांमधून हे शास्त्र शिकवले जाते.वर्ष१९६०पासून -अमेरिकन फेडरेशन ऑफ एस्ट्रोलॉजर्स येथे ज्योतिष शिकवले जाते.गेल्या२०वर्षांपासून फ्लोरिडा येथील ऍव्हलॉन स्कूल ऑफ एस्ट्रोलॉजी येथे ज्योतिष शिकवले जाते.याशिवाय वॉशिंग्टन (अमेरिका)येथील केप्लर कॉलेज, प्रोफेशनल एस्ट्रोलॉजर्स अलायन्स, इंटरनॅशनल ऍकॅडमी ऑफ एस्ट्रोलॉजी, केप्लर कॉलेज ऑफ एस्ट्रोलॉजिकल आर्टस् ऍण्ड सायन्स, नॅशनल कौन्सिल फॉर जिओकॉस्मिक रिसर्च,ऑस्ट्रेलिया येथील फेडरेशन ऑफ ऑस्ट्रेलियन एस्ट्रोलॉजर्स, इंटरनॅशनल सोसायटी फॉर एस्ट्रोलॉजिकल रिसर्च, फेडरेशन ऑफ ऑस्ट्रेलियन एस्ट्रोलॉजर ही यादी खूप मोठी आहे.या विद्यापिठांत ज्योतिषाविषयी पदविका ते पदवीपर्यंचे शिक्षण दिले जाते. थोडक्यात आपल्या महान भारतीय संस्कृतीचा,तसेच शास्त्रांचा विदेशात सखोल अभ्यास आणि संशोधन केले जात आहे;मात्र या शास्त्राची जननी असलेल्या भारतभूमीत त्याला अशास्त्रीय म्हणून काही तथाकथित पुरोगामी आणि नास्तिक विरोध करत आहेत,हे दुर्दैवी आहे.उद्या विदेशी लोकांनी ज्योतिष विषयाचे महत्त्व सांगायला प्रारंभ केल्यावर भारतीय जागे होणार आहेत का?

१०.राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे(एनसीएल)निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ शुक्ल यांनी सांगितले, ३५वर्षांच्या संशोधनानंतर मी छातीठोकपणे सांगू शकतो की,ज्योतिष हे शास्त्रच आहे.

११.राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये ज्योतिष हा विषय शिकविण्यास आरंभ केला असून त्याला मिळणारा प्रतिसादही चांगला आहे.अनेकांनी तर या विषयातफपी.एचडी.सुद्धा मिळाली आहे.

या अनुषंगाने मूठभर लोकांनी विरोध केला म्हणून ज्योतीषशास्त्राचा अभ्यासक्रम बंद करू नये अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन

Next Post

देशाच्या गौरवशाली इतिहासा चे स्मरण करूया – पालकमंत्री गुलाबरावजी पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशाच्या गौरवशाली इतिहासा चे स्मरण करूया - पालकमंत्री गुलाबरावजी पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेत ‘महायुती’चे रणशिंग: भाजप-शिंदे गटाची युती जाहीर
1xbet russia

जळगाव महापालिकेत ‘महायुती’चे रणशिंग: भाजप-शिंदे गटाची युती जाहीर

December 24, 2025
जळगाव : विभागीय सहसंचालक पद तात्काळ नियमित नियुक्त करा
1xbet russia

राज्यातील २९१ बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार!

December 24, 2025
जळगावात उद्या २५ डिसेंबर रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर
Uncategorized

जळगावात उद्या २५ डिसेंबर रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर

December 24, 2025
१०० टक्के रक्तपुरवठा खंडीत झालेल्या महिलेवर हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

१०० टक्के रक्तपुरवठा खंडीत झालेल्या महिलेवर हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया

December 24, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव महापालिकेत ‘महायुती’चे रणशिंग: भाजप-शिंदे गटाची युती जाहीर

जळगाव महापालिकेत ‘महायुती’चे रणशिंग: भाजप-शिंदे गटाची युती जाहीर

December 24, 2025
जळगाव : विभागीय सहसंचालक पद तात्काळ नियमित नियुक्त करा

राज्यातील २९१ बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार!

December 24, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon