जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत इंडिया पोस्ट ऑफिस स्कीम्स अँड बेनिफिट्स या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये विविध योजना व त्यांचे फायदे, जीवनमूल्य, तसेच संचय आणि गुंतवणूक या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. शेखर बी. इंगळे (डी.ए., इंडिया पोस्ट, जळगाव विभाग, जळगाव मुख्य कार्यालय) तसेच बिझनेस करस्पॉन्डंट, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, जळगाव शाखा) यांनी उपस्थित राहून माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत श्री. सतीश पाटील, डेव्हलपमेंट ऑफिसर यांनीही उपस्थित राहून मौल्यवान माहिती दिली.कार्यक्रमाचे उद्दिष्ट अध्यापक व विद्यार्थ्यांना बचत, गुंतवणूक आणि विविध सरकारी योजनांची माहिती देणे हे होते. या उपक्रमाद्वारे उपस्थित सर्वांना भविष्यातील आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला असून, सर्व उपस्थितांनी या सत्रातून मौल्यवान ज्ञान आणि प्रेरणा मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.